<May 2024>
SuMoTuWeThFrSa
2829301234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930311
2345678

मराठी ग्रंथसंग्रहालय, हैदराबाद . ( दक्षिण )

घटना व नियम


१. अनामत :
(अ) प्रत्येक साधारण सभासदाने रु. ४००/- (रु. चारशे) प्रत्येकी पुस्तकासाठी अनामत ठेवली पाहिजे. तसेच हाच नियम आजीव सभासदसाठीही लागू आहे.
२. प्रवेश :
 à¤ªà¥à¤°à¤µà¥‡à¤¶ शुल्क रु. २५/- आकारले जाईल. याव्यतिरिक्त एका कार्डासाठी रु. १०/- व दोन कार्डसाठी रु. २०/- घेण्यात येईल.
 à¥©. मासिक वर्गणी :
साधारण सभासदासाठी मासिक वर्गणी रु. २५/- (रु. पंचवीस) राहील. वर्गणी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात यावी. कोणत्याही सभासदाकडे एक महिन्यापेक्षा अधिक बाकी राहिल्यास पुस्तके देणे स्थगित करण्यात येईल.
४. पुस्तकाची देवघेव :
(अ) प्रत्येक साधारण सभासदास एकावेळी एकच पुस्तक आपल्या नावावर घेता येईल.
(आ) मासिक योजनेअंतर्गत चालू अंकाव्यतिरिक्त दोन अन्य मासिक आपल्या नावावर घेता येईल. मासिक योजनेअंतर्गत रु. १००/- अनामत ठेवावी लागेल. मासिक वर्गणी रु. ३०/- आकारली जाईल.
(इ) आजीव सभासदास एका वेळी दोन पुस्तके घेता येतील.
(ई) सर्व सभासदांनी पुस्तक घेतल्या दिवसापासून पंधरा दिवसांच्या आत ते परत केले पाहिजे. उशीर झाल्यास दर पुस्तकास पुढील दंड आकारण्यात येईल. ७ दिवस = रु. ५/- ८ ते १५ दिवस = रु. १२/- १६ ते ४५ दिवस = रु. २५/- ४५ ते ६० दिवस = रु. ३५/- ६० दिवसानंतर रु. ५०/- आणि स्मरणपत्र पाठविले असल्यास रु. १०/- अतिरिक्त आकारले जातील. ९० दिवसानंतर साधारण सभासदत्व रद्द करण्यात येईल. आजीव सभासदांना पुस्तके देण्याचे स्थगित करण्यात येईल.
 (उ) १५ दिवसानंतर पुन्हा तेच पुस्तक / पुस्तके पाहिजे असल्यास कोणाचीही पुस्तकासाठी मागणी नोंदवली नसल्यास, ते पुस्तक / पुस्तके पुन्हा नोंदवून घेता येईल.
 (ऊ) आपणास पाहिजे असलेल्या पुस्तकाची मागणी सभासदांनी नोंद वहीत (Claim Register) नोंदवावी. पुस्तक परत आल्यावर नोंदवहीतील क्रमाप्रमाणे पुस्तके देण्यात येईल.
५. पुस्तकाची सुरक्षितता :
 (अ) कोणतेही पुस्तक नेताना ते चांगल्या स्थितीत असल्याची खात्री सभासदांनी करून घ्यावी. एखादे पुस्तक चांगल्या स्थितीत नसल्यास ते ग्रंथापालाच्या नजरेस आणून द्यावे व त्याप्रमाणे नोंद करून नंतरच ते पुस्तक आपल्या नावावर घ्यावे. पुस्तक घेतल्यानंतर ते चांगल्या स्थितीत ठेवण्याची दक्षता सभासदांनी घ्यावी.
 (आ) घेतलेले पुस्तक फाटल्यास अथवा हरवल्यास त्याची जबाबदारी सभासदांवर राहील.
 (इ) सभासदांनी परत केलेले पुस्तक चांगल्या स्थितीत नसल्यास त्या बाबत योग्य तो दंड आकारण्यात येईल. दंडाची रक्कम किंवा पुस्तकाची किंमत भरल्याशिवाय सभासदांना दुसरे पुस्तक नेता येणार नाही.
(ई) नेलेले पुस्तक हरवल्यास १५ दिवसांचे आत नवीन पुस्तक सभासदाने आणून द्यावे किंवा चिटणीस / कार्यवाह ठरवतील ती रक्कम द्यावी. त्यानंतरच दुसरे पुस्तक नेता येईल.
६. संदर्भ ग्रंथ :
 à¤¸à¤‚दर्भ ग्रंथ व ग्रंथालयातच वाचण्याची सोय केली आहे. त्याकरिता सभासदाला अर्ज करून कार्यवाहाची मंजुरी मिळाल्यानंतर पुस्तक तथा ग्रंथ वाचण्यास देण्यात येईल.
७. अधिकार पत्र :
(अ) एखाद्या सभासदास पुस्तकांची देवघेव करण्यासाठी ग्रंथालयात येणे अशक्या असल्यास / झाल्यास अन्य व्यक्तीस कायम किंवा तात्पुरते अधिकारपत्र देता येईल. लेखी अधिकारपत्र असलेल्या व्यक्तिसच पुस्तकांची देवाणघेवाण सभासदाच्या नावावर करता येईल. तथापि पुस्तकासंबंधीची सर्व जबाबदारी मूळ सभासदाची राहील. लेखी अधिकारपत्र असल्याशिवाय कोणत्याही सभासदाच्या नावावर पुस्तक नेता येणार नाही.
(आ) जे सभासद काही कारणामुळे ग्रंथालयात येऊ शकत नाहीत अशा सभासदांसाठी त्यांच्या जबाबदारीवर ३ महिने पुस्तक त्यांच्या प्रतिनीधीस द्यावे व आवश्यक असल्यास ३ वेळेस असे करता येईल. त्यानंतर साधारण / आजीव सभासदांना असलेली मासिक वर्गणी सेवाभार म्हणून आकारण्यात येईल.
८. वादग्रस्त प्रश्न : पुस्तकांची देवघेव, हरवलेल्या पुस्तकांची किंमत आकारणे, चांगल्या स्थितीत नसलेल्या पुस्तकाबाबत दंड आकारणे इत्यादी संबंधीच्या वादग्रस्त प्रश्नाबाबत चिटणिसांचा निर्णय अखेरचा समजला जाईल.